युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याचे आव्हान भारत सरकारसमोर उभे असून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात येत आहे. यामाध्यमातून बेळगावमधील आणखी ९ विद्यार्थी आज मायदेशी परतले असून आज त्यांचे आगमन बेळगावमध्ये झाले आहे. त्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ऑपरेशन गंगा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न भारत सरकारतर्फे करण्यात येत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे हजारो भारतीय त्याठिकाणी अडकून आहेत. यामधील विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने परत आणण्यात येत असून या अंतर्गत आज बेळगावमधील ९ विद्यार्थी आपल्या मायदेशी परतले आहेत. आज बेळगाव येथे आगमन झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
सांबरा विमानतळावर ७, हुबळी येथे २ अशा ९ विद्यार्थ्यांचे आज आगमन झाले असून जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली आज या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या मुलांचे मोठ्या आनंदात स्वागत केले. श्रेया हेरकल, मूडलगी तालुक्यातील हळळूर या गावातील प्रिया आणि प्रीती छब्बी या दोन बहिणी, गोकाक तालुक्यातील अमोघ चौगुले, रायबाग तालुक्यातील प्रिया निडगुंदि आणि बागलकोटमधील दोन विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे आज आगमन झाले आहे. या साऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. (बाईट +
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, बेळगावमधील युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १७ विद्यार्थी सुखरूप परतले आहेत. उर्वरित ३ विद्यार्थी पोलंड येथे असून त्यांनाही तातडीने याठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरच तिन्ही विद्यार्थी मायदेशी परततील, बेळगावमधील अनेक विद्यार्थी पोहोचल्यामुळे त्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले
युक्रेन रशिया यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी भारत सरकार अजूनही प्रयत्न करत आहे. बेळगावमधील विद्यार्थी आपल्या मायदेशी परतल्याने विद्यार्थी आणि पालकांनी सरकारचे आभार मानले आहेत.


Recent Comments