Belagavi

वनांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी : जिल्हाधिकारी

Share

 वनांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. वनासह वन्यजीवांचेही रक्षण करून प्रत्येकाने हे कर्तव्य पार पाडले पाहिजे असे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले.

वन खाते आणि वन्यजीव परिसर विकास संघातर्फे गुरुवारी बेळगावात जागतिक वन्यजीव दिन आणि वन्यजीव परिसर विकास संघाचा पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला. वन खात्याच्या कार्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम झाला. त्याच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षणाधिकारी विजयकुमार सालीमठ होते. जिल्हाधिकाऱ्यांसह व्यासपीठावरील मान्यवरांनी रोपट्याना पाणी घालून या कार्यक्रमाचे उदघाटन केले. फ्लो यावेळी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, वन प्रदेशाचे आणि वन्यजीवांचे रक्षण करणे ही केवळ वनखात्याची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने यात योगदान दिले पाहिजे. संघ-संस्थांनी यासाठी हातभार लावला पाहिजे. वन्यजीव परिसर विकास संघातर्फे यादृष्टीने चांगले काम करण्यात येत आहे. व्हॅक्सिन डेपोमध्ये रोप लावणी आणि स्वच्छतेचे काम त्यांनी हाती घेतले आहे. हा उपक्रम प्रशंसनीय आहे. या कामाचा आवाका वाढला पाहिजे. यासाठी समाजातील संघ-संस्थांनी यात सहभागी व्हावे. जिल्ह्यात १८% वनक्षेत्र आहे. त्यात आणखी ३% वाढ झाली पाहिजे. वनखात्याला अधिक अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मुख्य वनसंरक्षणाधिकारी विजयकुमार सालीमठ यांनीही विचार मांडले. यावेळी बेळगाव वन विभागातून मुख्यमंत्री पदक प्राप्त केलेल्या वनाधिकारी आणि वनक्षेत्रपालांचा सत्कार करण्यात आला. वन्यजीव परिसर विकास संघाचे अध्यक्ष सुरेश उरबिनट्टी यांनी स्वागत करून परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर उपवनसंरक्षणाधिकारी हर्ष भानू, अधिकारी शिवानंद नाईकवाडी, शंकर कल्लोळकर, संघाचे उपाध्यक्ष श्रीशैल मठद, सचिव डॉ. डी. एन. मिसाळे, खजिनदार जगदीश मठद, शारदा सालीमठ, डॉ. ए. एल. पाटील, शिवशंकर अब्बायी, उदयसिंग राजपूत, रवींद्र कुलकर्णी, ए. पी. मानगे, एसीएफ मल्लिनाथ कुसनाळ यांच्यासह वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Tags: