बेळगाव शहरात हिजाबवरून विद्यार्थिनी आणि कॉलेज व्यवस्थापनात सोमवारी पुन्हा वाद झाल्याची घटना घडली असून, हिजाबसाठी विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

हिजाब वादावर अंतिम निकाल देईपर्यंत गणवेश वगळता कसलीही धार्मिक वस्त्रे घालून कॉलेजमध्ये येऊ नये असा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने बजावला आहे. तरीही बेळगावातील लिंगराज आणि आरएलएस महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी अनेक मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब घालूनच आल्या होत्या. यावेळी कॉलेज व्यवस्थापनाकडून विद्यार्थिनींना हिजाब काढून या असे समजावून सांगण्यात आले. मात्र ते न ऐकता विद्यार्थिनींनी हिजाब घालूनच प्रवेश देण्याचा हट्ट धरला. त्यामुळे कॉलेज व्यवस्थापनाने या 40 विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला. यावेळी कॉलेजसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतुत्वाखाली या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. 
त्यावेळी या विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून हिजाब घालून कॉलेजात प्रवेश देण्याची विनंती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ याना भेटून केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कॉलेज व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे विद्यार्थिनी पुन्हा कॉलेजकडे परतल्या. फ्लो
कॉलेजात आल्यावर विद्यार्थिनींनी प्राचार्यांशी चर्चा केली. मात्र परीक्षा द्यायची असेल तर न्यायालयाच्या आदेशाचे सक्तीने पालन करून, हिजाब काढूनच कॉलेजमध्ये येण्याची सूचना प्राचार्यांनी केली. परंतु, आम्ही हिजाब घालूनच कॉलेजात येणार या हट्टावर विद्यार्थिनी अडून बसल्या. त्यामुळे कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना प्रवेश नाकारला. परिणामी विद्यार्थिनी घरी परतल्या. 
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विद्यार्थिनींनी सांगितले की, आम्हाला कॉलेजला प्रवेश देण्यापूर्वीच हिजाब नको असे सांगितलेले नव्हते. आताच हा नवीन नियम का लावत आहेत? हिजाब हा आमचा अधिकार आहे. परीक्षा असो किंवा अन्य काही, आम्ही हिजाब घालूनच कॉलेजला येणार असे त्यांनी सांगितले. बाईट + बाईट यावेळी बोलताना आणखी एका विद्यार्थिनीने सांगितले की, आधी आम्हाला हिजाब घालण्यास अनुमती दिली होती. पण आता हिजाब काढण्यास सांगत आहेत. आमची इंटर्नल एक्झाम आहे. त्याचा निकाल वार्षिक परीक्षेतही ग्राह्य धरला जातो. कॉलेज विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास परवानगी आहे असे सरकारी आदेश सांगतो. परंतु प्राचार्य मात्र तो चालत नाही असे सांगत आहेत.
एकंदर, पुन्हा बेळगावात हिजाबचा वाद पेटलाय. हिजाब पाहिजेच म्हणत परीक्षेवर बहिष्कार टाकून विध्यार्थिनीघरी निघून गेल्या आहेत. आता या वादावरील उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच सगळी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.


Recent Comments