राज्यात उफाळून आलेला हिजाब – केसरी वाद आणि यामागे कार्यरत असणारा संघ म्हणून एसडीपीआर संघावर आरोप करण्यात येत होते. मात्र हे आरोप धादांत खोटे असल्याचे संघटनेने सांगितले असून आपल्यावरील झालेल्या आरोपासंदर्भात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुलासा करण्यात आला आहे.

: बेळगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसडीपीआय कार्यकर्त्यांनी सांगितले कि राज्यात सुरु असलेल्या हिजाब – केसरी वादामागे आपला कोणताही हात नाही. यासाठी कोण कारणीभूत आहे हे बहुतांशी लोकांना माहित आहेत. यामागे कोणाचा हात आहे, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पोहोचले याची माहिती साऱ्यांनाच आहे. परंतु याबाबत कोणीही बोलताना दिसून येत नाहीत. याचा आरोप मात्र आमच्या संघटनेवर करण्यात आला असून हे आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय आजच्या मुलांना काहीही शिकवण्याची आवश्यकता नसून सर्व विद्यार्थी घटनेने दिलेल्या अधिकारानुसार जगत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यासह राज्याच्या आगामी अर्थसंकल्पासंदर्भात देखील या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणासाठी विशेष सवलती देण्यात याव्यात, शिक्षण अधिक प्राधान्य देण्यात यावे, राज्यातील सर्व शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, शैक्षणिक क्षेत्रातील गैरसोयी दूर करण्यात याव्यात, तसेच शिक्षणासाठी ३० हजार कोटींचे आरक्षण देण्यात यावे, याचप्रमाणे राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिल्हापातळीवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
राज्यात सुरु असलेल्या हिजाब – केसरी वादामागे एसडीपीआय संघटनेचा हात असल्याचा आरोप समोर येत होता. परंतु आपल्या संघटनेवर करण्यात आलेले आरोप खोडून हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण एसडीपीआय संघटनेने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले आहे.


Recent Comments