बेळगाव तालुक्यातील कलखांब, मुचंडी आणि अष्टे चंदगड भागातील शेतकऱ्यांना रेल्वे ओव्हर ब्रिज आणि रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे होणाऱ्या समस्यांसंदर्भात आ. सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडण्यात आले.

होय, रेल्वे ओव्हर ब्रिज आणि रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे होणाऱ्या समस्यांसंदर्भात आ. सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली कलखांब, मुचंडी आणि अष्टे चंदगड या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांची शुक्रवारी भेट घेऊन चर्चा केली. नवा रेल्वे ओव्हरब्रीज आणि रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणार नाही अशा पद्धतीने करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या संदर्भात माहिती देताना बाळू कुरुबर यांनी सांगितले की, नवा रेल्वे ओव्हरब्रीज आणि रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामामुळे कलखांब, मुचंडी आणि अष्टे चंदगड या भागातील शेतकऱ्यांना आपली सुपीक जमीन गमवावी लागणार आहे. ही बाब आ. सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन चर्चा केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी येथे नवा रेल्वे ओव्हरब्रीज न बांधता, जुन्या ब्रिजचेच आधुनिकीकरण करावे अशी मागणी त्यांनी केली.

या संदर्भात आ. सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. नवा रेल्वे ओव्हरब्रीज आणि रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी कलखांब, मुचंडी आणि अष्टे चंदगड या भागातील पंचायत सदस्य, शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments