Belagavi

मुरुगेश निरानि यांच्यावर बसवजयमृत्युन्जय स्वामींचा संताप

Share

मंत्री मुरुगेश निरानि यांनी आपल्या समाजाची जाहीरपणे माफी मागावी. यासोबतच समाजासाठी त्यांनी काय दान दिले आहे हे सांगावे. त्यांनी जे काही आपल्या समाजासाठी दिले आहे ते तात्काळ त्यांना परत करू असे वक्तव्य कुडलसंगम पिठाचे जयमृत्युन्जय स्वामी यांनी केले आहे.

शहरातील गांधी भवन येथे पंचांसाली समाजाच्या कार्यकारिणीची बैठक बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी स्वामीजी बोलत होते. या कार्यक्रमात राणी चन्नम्मा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.

या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष विजयानंद काशाप्पांवर, आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ , अरविंद बेल्लद, माजी मंत्री ए.बी.पाटील , प्रकाश हुक्केरी , शशिकांत नाईक , माजी आमदार डॉक्टर विश्वनाथ पाटील, महिला आघाडीच्या वीणा काशाप्पांवर, रोहिणी पाटील व इतर नेते उपस्थित होते. बैठकीत २ ए आरक्षणा मिळविण्यासाठी आगामी आंदोलनाच्या रूपरेषा ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली .

बैठकी नंतर बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले कि, राज्यातून २ ए आरक्षण आणि केंदातून ओबीसी आरक्षण देण्याची मागणी करत वर्षभरापासून आमचे आंदोलन सुरु आहे . आज राज्य कार्यकारीणी बैठकीत तीन महतवाचे निर्णय घेण्यात येईल. राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीची मुदत मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून पंचमसाली समाजाचा संघर्ष अजूनही सुरु आहे, अशी माहिती स्वामींनी दिली.

बसवजय मृत्युंजय स्वामी पुढे बोलताना म्हणाले, आपल्याला कायम आपल्या भक्तांच्या सानिध्यात आणि उपकाराच्या राहायला आवडेल. इतर कोणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली राहणे आवडणार नाही. याचप्रमाणे मंत्री मुरुगेश निरानि यांनी टाकलेल्या पोस्ट संदर्भात देखील स्वामीजींनी संतापजनक प्रतिक्रिया दिली असून मुरुगेश निरानि यांनी सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी स्वामींनी केली.

Tags: