Belagavi

बैलहोंगल परिसरात कित्तूर चन्नम्मा यांच्या पुण्यतिथीनिम्मंत कार्यक्रमाचे आयोजन

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरात वीरमाता राणी चन्नम्मा यांच्या १९३ व्या पुण्यतिथी निमित्त तसेच समाज सुधारकांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बैलहोंगल परिसरातील राणी चन्नम्मा ऐक्य मानतात मार्ग, गणचारी महाविद्यालय येथे अखिल भारत लिंगायत पंचमसाली महासभा कुडलसंगम क्षेत्र तसेच कित्तूर गावच्या लिंगायत पंचमसाली घटक यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी माजी आमदार व्ही आय पाटील यांनी समाज संघटनेसाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी त्यांच्या आदेशाचे पालन करून समाजसंघटनेच्या दृष्टिकोनातून कार्य केले पाहिजे, असे मत व्ही आय पाटील यांनी व्यक्त केले.

याचप्रमाणे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ बोलताना म्हणाले, समाज संघटनेच्या दृष्टिकोनातून बसवमृत्युन्जय स्वामींच्या नेतृत्वाने सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. याचप्रमाणे वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांनी एकत्र यावे, चन्नम्मा स्मारकाचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी कुडलसंगम पंचमसाली पिठाचे बसव जय मृत्युंजय स्वामी, मुरुसावीर मठाचे प्रभू नीलकंठ स्वामी, पंचमसाली राष्ट्रीय अध्यक्ष विजयानंद कशाप्पांनावर, आमदार महांतेश कौजलगी, अरविंद बेल्लद, माजी आमदार शिवशंकर, जिल्हा पंचायत माजी सदस्या रोहिणी पाटील, शंकर मुडलगी, पंचमसाली नेते श्रीशैल बोलन्नावर, पंचनगौड दयामनगौडर, एफ एस सिद्दनगौडार, आदी उपस्थित होते.

Tags: