म्हादई योजनेंतर्गत मिळणारे ३.९ कोटी आम्हाला पुरेसे नाही. आम्हाला ७.५ टीएमसी पाणी मिळायलाच हवे, यासाठी आमचा लढा सुरु राहणार असून स्थगित झालेल्या पदयात्रेसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया माजी पाटबंधारे मंत्री एम बी पाटील यांनी दिली आहे.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी म्हादई योजनेसंदर्भात महत्वाची भूमिका घेतली आहे. अधिकृतरीत्या ७.५ टीएमसी पाणी वितरणाऐवजी केवळ ३.९ टीएमसी पाणी कर्नाटक देण्यात येत आहे. इतका पाणीपुरवठा आम्हाला पुरेसा नसून संपूर्ण ७.५ टीएमसी पाणी कर्नाटकाला मिळावे, यासाठी लढा देणार असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात केवळ राजकीय कारणास्तव विरोध करण्यात येत आहे. मात्र गोव्यालाही विरोध करणे योग्य नसल्याचे माहित आहे. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आपण भेट घेऊन डीपीआरला मंजुरी मिळविण्यासंदर्भात चर्चा केली होती. प्रशासकीय पातळीवर अनुमोदन मिळविले. परंतु आता यावर कोणताही प्रतिसाद मिळत नसून यासंदर्भात शासन, जलसंपदा विभाग, अथवा भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी एम बी पाटील यांनी केली.
दोन्ही राज्यांची स्थिती, पक्षांची तत्वे वेगळी आहेत. जेव्हा जागावाटपाचा मुद्दा येतो तेव्हा राजकीयदृष्ट्या पक्षाचा मुद्दा येतो. मात्र पाण्याच्या हक्काच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. पाच वर्षे पाटबंधारे मंत्री म्हणून कार्यरत असतानाही लढा दिला आणि यापुढेही आमचा लढा सुरूच ठेवू. याचा निवडणुकीशी कोणताही संबंध नसून आम्ही आमचा हक्क मागत नसून आमच्या हक्कासाठी संघर्ष करू असे देखील एम बी पाटील यांनी स्पष्ट केले.
गोव्याच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस किंवा अन्य पक्ष सत्तेवर येतील यात प्रश्नच नाही. राजकीयदृष्ट्या प्रतिक्रिया द्यायची असल्यास काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल असे मी सांगेन. तेथील सरकार त्यांच्या राज्याची भूमिका घेतात, आम्हाला आमच्या राज्याची भूमिका घेण्याचा अधिकार आहे.यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नाही, अशी ठाम भूमिका एम बी पाटील यांनी व्यक्त केली.
गोविंद कारजोळ समर्थक आणि एम बी पाटील यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादाबाबत बोलताना एम बी पाटील म्हणाले, हा वाद विजापूरपुरता मर्यादित आहे. दोन पाणी निनावी जाहिरात देण्यात येऊन मला टार्गेट करण्यात आले असून माझ्या या जाहिरातीही संबंध नसल्याचे एम बी पाटील म्हणाले.
हुबळी, धारवाड सहित पाच जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. मलप्रभा डॅममध्ये इतिहासात दोन ते तीन वेळा वगळता मोठ्या प्रमाणात पाणी भरले नाही. म्हादईयोजनेवर उत्तर कर्नाटकातील ५ जिल्हे अवलंबून आहेत. हि योजना त्वरित कार्यान्वित होणे गरजचे असल्याचे मत एम बी पाटील यांनी व्यक्त केले.


Recent Comments