बेळगावातील मराठी कार्यकर्त्यांवर घातलेले राष्ट्रद्रोहाचे खोटे गुन्हे कर्नाटक पोलिसांनी मागे घेतले आहेत, त्याशिवाय अटकेतील कार्यकर्त्यांना जामिनही मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापूर–बेळगाव नियोजित दांडीयात्रा रद्द केली.

होय, छत्रपती शिवरायांच्या बेंगळुरातील पुतळ्याची विटंबना झाल्याचे तीव्र पडसाद बेळगावात उमटले होते. यावेळी काही समाजकंटकांनी वाहनांवर दगडफेक केली होती. शिवाय संगोळ्ळी रायन्ना यांच्या पुतळ्याचीही विटंबना करण्यात आली होती. याचा ठपका ठेऊन पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह काही निष्पाप युवकानाही अटक करून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल केले होते. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेने आज कोल्हापुरातून बेळगावपर्यंत दांडीयात्रा काढण्याची घोषणा केली होती. मात्र उच्च न्यायालयाने काही कार्यकर्त्यांना जमीन मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनीही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सिद्ध करण्यात अपयश येणार असल्याची खात्री पटल्याने ते मागे घेतले आहेत. त्यामुळे शिवसेनेने आपली नियोजित दांडीयात्रा रद्द केली असल्याचे घोषित केले आहे. याबाबत समाजमाध्यमांवर संदेश व्हायरल झाला आहे.


Recent Comments