Belagavi

धर्मांतर बंदी विधेयकाने बसवण्णांचा अवमान : शिवकुमार

Share

 शरण संस्कृती, बसवण्णांची तत्वे, भूमीचा हे सरकार अवमान करत आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी तर बसवण्णांचे नाव लावले आहे, हे सगळे मातीशी द्रोह करत आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला

धर्मांतर बंदी विधेयकावर पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले, सरकार ४०% कमिशन घेत नाही हे त्यांनी सिद्ध करायला पाहिजे होते. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने हे विधेयक आणून भाजप सरकार विषयांतर करत आहे. विधेयकावर चर्चेसाठी काल नोटीस द्यायला हवी होती. आज चर्चा होणार आहे हे आधी कळवायला हवे होते. मंत्री आर. अशोक उत्तर देत असताना त्यांना थांबवून सभापती कागेरी यांनी त्यांना थांबवत विधेयक मांडण्याची सूचना करून सत्ताधाऱ्यांची बाजू घेतली. त्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन बसावे अशी खरमरीत टीका सभापतींवर केली.

कर्नाटक ही बसवण्णांची भूमी आहे. सगळ्या वर्गांना एकत्र आणून त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना करून क्रांती केली. समाजातील वंचित, बहिष्कृत वर्गांना जवळ घेत लिंगदीक्षा देऊन मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही बौद्ध धर्म स्वीकारला होता. मुख्यमंत्री शरण संस्कृतीचा मोठा अवमान करत आहेत. आपण बसवण्णांचे अनुयायी असल्याचे सांगत त्यांच्याशी द्रोह करत आहेत. हे सगळे भाजपवाले असेच आहेत अशी टीका शिवकुमारांनी केली.

एकंदर आंबेडकरांनी लिहिलेली घटना आधी त्यांनी वाचावी, घटनेच्या विरोधात जाऊन सरकार धर्मांतर बंदी कायदा आणत आहे असा आरोप शिवकुमार यांनी यावेळी केला.

 

 

Tags: