Belagavi

मुख्यमंत्र्यांना बदलण्याचा प्रश्नच येत नाही : रेणुकाचार्य

Share

राज्यात पुन्हा नेतृत्वबदल या केवळ अफवा आहेत. मुख्यमंत्री बोम्मई भावुक होऊन बोलले याचा कोणी गैरअर्थ काढू नये असे मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एम. पी. रेणुकाचार्य यांनी सांगितले

व्हॉईस ओव्हर : सोमवारी सुवर्णसौधमध्ये ‘आपली मराठी’सोबत बोलताना मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एम. पी. रेणुकाचार्य यांनी सांगितले की, आपल्या शिग्गावी मतदारसंघातील जनतेला पाहून त्यांनी निवडून दिल्यामुळेच आज मुख्यमंत्री होऊ शकलो या भावनेतून भावुक उद्गार काढले. त्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. मुख्यमंत्र्यांना बदलण्याचा प्रश्नच येत नाही.

येडियुरप्पा यांना राष्ट्रीय नेत्यांनी चांगली संधी दिली. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी कोणीही त्यांच्यावर दबाव आणला नाही. त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर बोम्मई उत्तम कारभार हाकत आहेत असेही रेणुकाचार्य यांनी स्पष्ट केले.

 

 

Tags: