Belagavi

धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची विहिंपची मागणी : मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक संकेत

Share

 धर्मांतर देशाच्या अखंडतेला मारक ठरत आहे. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या उत्तर प्रांतातर्फे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे

विश्व हिंदू परिषदेच्या उत्तर कर्नाटक प्रांतातर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले, धर्मांतर देशाच्या अखंडतेला, ऐक्याला धोका निर्माण करत आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व धर्मात राहून करण्यात येत असलेले धर्मांतर रोखण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर उपाय करावेत अशी मागणी त्यांनी केली.

https://fb.watch/9-OhV37FOr/

निवेदन स्वीकारून बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आपले अस्तित्व गमावून जगणे कोणालाच शक्य नाही. समाजात सर्व धर्म आहेत. आमच्या गरिबीचा, असहायतेचा गैरफायदा घेऊन दुरुपयोग करण्याचा प्रयत्न होत आहे. जोर-जबरदस्तीने, आमिषे दाखवून धर्मांतर करण्यास घटनेतच बंदी घातली आहे. त्यामुळे आम्ही दोन कामे केली पाहिजेत. एक तर या विरोधात कठोर कायदा आणला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदू धर्म संकटात असताना शंकराचार्यांनी जशी सामाजिक चळवळ उभारली तशी सामाजिक चळवळ उभारली पाहिजे असे बोम्मई म्हणाले.

एकीकडे धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे प्रस्तावित कायद्याला विरोध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेते हे पहावे लागेल.

 

 

 

Tags: