खानापूर तालुक्यातील विविध गावच्या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन भाजप बेळगाव ग्रामांतरच्या उपाध्यक्षा सोनाली सरनोबत यांनी मंत्र्यांना दिले.

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कक्केरी आणि पारिशवाड जिल्हा पंचायत मतदारसंघात पोलीस दूरक्षेत्र स्थापन करावीत या मागणीचे निवेदन त्यांनी मंत्री अश्वथनारायण याना दिले. त्याचप्रमाणे कक्केरी ग्रापं हद्दीतील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या स्मशानभूमींना वीज पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन सोनाली सरनोबत यांनी ऊर्जा मंत्री पी. सुनीलकुमार यांना दिले.


Recent Comments