Belagavi

जनतेच्या प्रश्नांवर चर्चेऐवजी आंदोलनाचे नाटक : शेट्टर यांची काँग्रेसवर टीका

Share

 उत्तर कर्नाटकातील बेळगावात विधिमंडळ अधिवेशन होत आहे. त्यात भाग घेऊन जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करायची सोडून काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नाटक करत आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली.

गुरुवारी सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना शेट्टर यांनी काँग्रेसच्या आरोपांची खिल्ली उडवली. राज्य सरकार पर्सेंटेज सरकार असल्याचा काँग्रेसचा आरोप खोटा आहे. त्यात काही दम नाही. आरोपांबाबत काही साक्षी-पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावे. उगाचच कोणीतरी पत्र लिहिले म्हणून आरोप-आंदोलन करत बसण्यात काही अर्थ नाही. पुरावे दिल्यास कंत्राटदाराकडे कोणी काय मागितले अन घेतले ते बाहेर येईल. पुरावेच नसल्याने ते देणार तरी कुठून असा टोला त्यांनी लगावला.

 

Tags: