Belagavi

हे म्हणजे भुताच्या तोंडी भगवद्गीता… !

Share

 देशात हेलिकॉप्टर, इंधन घोटाळा, राज्यात पाटबंधारे, पीडब्ल्यूडी घोटाळा करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराबाबत बोलणे म्हणजे भुताच्या तोंडी भगवद्गीता असा प्रकार असल्याची टीका महसूल मंत्री आर. अशोक यांनी केली.

गुरुवारी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री अशोक म्हणाले, काँग्रेसवाले भ्रष्टाचाराचे पितामह, त्यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारविरहित कारभार सुरु आहे असा दावा त्यांनी केला.  मंत्री अशोक म्हणाले, काँग्रेसच्या काळात अनेक घोटाळे उघडकीस आले.

त्यावर ते बोलत नाहीत. आमच्यावर आरोप करताहेत, पण त्याबाबत त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही. पर्सेंटेजबाबत काँग्रेस नेत्यांनीच तक्रार द्यायला लावली आहे. हवेत गोळ्या मारणे हेच काँग्रेसचे धोरण आहे. त्यांच्याकडे स्पष्ट पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. पुरावे दिले तर त्यांचा खरा रंग उघड पडेल अशी भीती त्यांना वाटते असा पलटवार त्यांनी केला.  काँग्रेसने पुरावे दिल्यास आम्ही चौकशी करण्यास तयार आहोत असे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले.

 

Tags: