उमेदवाराच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळेच बेळगावात भाजपचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री आर. अशोक यांनी विधान परिषद निवडणूक निकालावर दिली आहे.

बुधवारी सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री आर. अशोक यांनी विधान परिषद निवडणुकीतील भाजपच्या पराभवाचा ठपका उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्यावर ठेवला. या पराभवाबाबत रमेश जारकीहोळी यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे मंत्री, आमदार आणि खासदारांनाही जबाबदार धरले पाहिजे असे ते म्हणाले. या पराभवाबाबत सखोल चर्चा करून पक्षांतर्गत चौकशी करण्याची मागणी पक्षातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments