एका मोठ्या नेत्याने मला फोन करून शांत राहण्यास सांगितले आहे. म्हणून गप्प आहे. पण लवकरच डी. के. शिवकुमार यांना जाहीर कठोर प्रत्युत्तर देणार आहे असा नवा बॉम्ब आ. रमेश जारकीहोळी यांनी फोडला आहे.
बुधवारी गोकाक येथे पत्रकार परिषदेत बोलताना आ. रमेश जारकीहोळी म्हणाले, शिवकुमार यांच्या विधानांना आताच कठोरपणे उत्तर दिले असते. पारंतू एका मोठ्या नेत्याच्या शब्दाला किंमत देऊन गप्प आहे. पण येत्या काही दिवसांत त्यांना सडेतोड उत्तर देणार आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांचा एकेरी उल्लेख करत रमेश जारकीहोळी यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. मी मागासवर्गातील एक प्रमुख नेता म्हणून पुढे येत असल्याचे पाहून सिद्दरामय्या घाबरलेत. आता आपले क्षे अशी भीती त्यांना वाटतेय. धनगर समाजाने तर त्यांना दूर लोटले आहेच, पुढील निवडणुकीतही ते पराभूत होतील असे सांगून, सिद्दरामय्या यांच्याबद्दल चर्चा नको, ती निरर्थक ठरेल असे ते म्हणाले. बाईट बेळगावमधील भाजपच्या पराभवाचा ठपका तुमच्यावर ठेवण्यात येत आहे का या प्रश्नावर, रमेश जारकीहोळी डोंगराएवढे ताकदवान आहेत, म्हणून डोंगरावर भर टाकण्यात येत आहे असे ते म्हणाले. तुमच्याविरोधात कट रचण्यात आला का या प्रश्नावर, मला सध्या त्याची खात्री नाही, त्याच्यावर विचार करून नंतर बोलतो, नेतृत्वाचा हाच तर गुण असतो असे रमेश म्हणाले.
https://fb.watch/9Vg3wa8Hwu/
काँग्रेसच्या पराभवासाठी मी पेटून उठलो होतो. पण तो पक्ष आता जिंकला आहे. त्यावर आता बोलून उपयोग नाही. अंतर्गत चौकशी करू, कोण चुकले आहे हे नंतर सांगतो. शेवटच्या ३ दिवसांत चित्र बदलले. त्या दिवसांत लखन जारकीहोळी यांच्याशी बोललो नाही. कुठे चूक झाली आहे याबाबत पक्षाच्या व्यासपीठावर बोलू, या पराभवाने मी पिछाडीवर गेलेलो नाही असे रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
एकंदर, सिद्दरामय्या, शिवकुमार यांच्याबाबत रमेश जारकीहोळी यांनी वाग्बाण सोडले आहेत. पुढे त्यांना ते काय कठोर उत्तर देतात हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.


Recent Comments