Belagavi

सर्वधर्मियांनी सौहार्दाने रहावे यासाठी धर्मांतर बंदी कायदा : गृहमंत्री

Share

 प्रस्तावित धर्मांतर बंदी कायदा कुठल्या एका धर्माच्या विरोधात नाही. उलट सर्व धर्माच्या लोकांनी सौहार्दाने रहावे यासाठी हा कायदा आणत आहोत असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले

बेळगाव अधिवेशनात भाग घेण्यासाठी सोमवारी सकाळी सुवर्णसौध येथे आले असता, पत्रकारांशी बोलताना गृह मंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, राज्यात सर्व धर्माच्या लोकांनी शांततेत आणि सौहार्दाने रहावे यासाठीच सरकार धर्मांतर बंदी कायदा आणत आहे. कुठल्या एका विशिष्ट धर्माच्या विरोधात हा कायदा नाही. त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. हा कायदा आणण्यास सरकार वचनबद्ध आहे. धर्मांतर करण्याचा प्रत्येकाला घटनादत्त अधिकार आहे. धर्मांतर होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. कायद्याच्या चौकटीत राहून, स्वयंप्रेरणेने लोक धर्मांतर करताहेत हे सिद्ध करावे लागेल. जुना धर्म त्यागून नवा धर्म स्वीकारण्याची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत व्हायला हवी. त्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे असे गृहमंत्री म्हणाले.

 

Tags: