बेळगाव जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी जनस्वराज यात्रा व मेळाव्यात मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी केले.

बेळगावात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कवटगीमठ म्हणाले, भारतीय जनता पक्षातर्फे सरकारची कामगिरी दाखवून देण्यासाठी जनस्वराज यात्रा काढून मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यात बेळगाव जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा. यापूर्वी दोनवेळा पक्षाने मला विधान परिषदेत संधी दिली आहे. त्या काळात अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. यावेळीही पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिल्यास स्थानिक स्वराज संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी अहर्निश प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.


Recent Comments