बेळगाव सीमाभागात कन्नडच्या रक्षणात कन्न्डपर आंदोलक, साहित्यिकांचे योगदान राहिले आहे. राजकारण्यांचा अपेक्षित सहभाग यात नाही अशी खंत कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी व्यक्त केली.

बेळगावातील शिवबसव नगरातील एस. जी. बाळेकुंद्री सभागृहात रविवारी कर्नाटक राज्योत्सवानिमित्त सीमाभाग विकास प्राधिकरण, बंगळूरच्या सप्तस्वर संगीत बळगतर्फे सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने उत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर बोलताना अशोक चंदरगी म्हणाले, राज्य सरकार ‘कन्नडसाठी आम्ही’, ‘बोला कन्नड बोला’ अशी अभियान चालवते. ती राजकारण्यांसाठी नाहीत का? राजकारण्यांना कन्नडच्या रक्षणाचे काही देणेघेणे नाही याचे उदाहरण हा कार्यक्रम आहे असे त्यांनी सांगितले. 
अशोक चंदरगी पुढे म्हणाले, तमिळनाडूत तमिलच्या विरोधात, महाराष्ट्रात मराठीच्या विरोधात बोलून दाखवले तर काय होते? कन्नड लोक उदार मनाचे आहेत. कर्नाटकात कन्नडच्या आणि सीमाभागाच्या रक्षणासाठी संस्था स्थापन झाल्या हेच मोठे आहे. १६ मे १९८२ रोजी डॉ. राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक गोकाक चळवळ बेळगावात सुरु झाली होती असे त्यांनी नमूद केले. बाईट प्रास्ताविकात टी. ए. वंटगोडी यांनी कन्नडच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.


Recent Comments