Khanapur

ट्रॅक्टरला भरधाव टँकरची धडक; दोघे जागीच ठार; एक जखमी

Share

 रस्त्यात थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव टँकरने धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार तर एकजण जखमी झाला. हा अपघात पुणेबेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हुबळीजवळील बुडरसिंगी क्रॉसवर झाला.

या अपघातात बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील रहिवासी २६ वर्षीय कलमेश यंकमनावर आणि हावेरी जिल्ह्यातील शिग्गावी तालुक्यातील अडविसोमापूरचा रहिवासी २७ वर्षीय कलमेश जाधव हे दोघे जागीच ठार झाले. तर मुंदगोडचा विनायक मानभाई हा जखमी झाला आहे. ट्रॅक्टर पंक्चर झाल्यामुळे रस्त्याकडेला थांबला होता.याचवेळी महाराष्ट्रातील भाऊसाहेब ढाकणे या टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून त्याच्या टँकरने थांबलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. टँकर हावेरीहून हुबळीकडे येत होता. ट्रॅक्टर ट्रेलरला जॅक लावण्यात आला होता. यावेळी ट्रॅक्टरच्या मागे थांबलेले कलमेश यंकमनावर आणि कलमेश जाधव जागीच ठार झाले. हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

 

Tags: