मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी म्हैसूर येथील कबिनी जलाशयात गंगापूजन केले. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली.
होय, कर्नाटकाची जीवनदायिनी कावेरी नदी सध्या भरून वाहात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी नदीवर बांधण्यात आलेल्या कबिनी जलाशयात गंगापूजन केले. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर, आ. एन. महेश आदी उपस्थित होते.

गंगापुजनानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, नोव्हेंबरमध्ये कृष्णराजसागर आणि कबिनी जलाशय भरलेला असणे दुर्मिळच आहे. त्यामुळे आनंद झाल्याने गंगापूजन केले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर आलमट्टी जलाशयातही गंगापूजन केले होते. शेतकऱ्यांचे कल्याण झाल्यास ते आमच्यासाठी भाग्यकारक ठरेल असे त्यांनी सांगितले.
अकाली निधन झालेले पॉवर स्टार पुनीत राजकुमार याना पद्मश्री पुरस्कार देण्याच्या विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांच्या मागणीवर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, पुनीत राजकुमार यांच्याबद्दल सर्वानाच आदर आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याबाबत सर्वसंमतीने शिफारस झाली पाहिजे. त्यामुळे योजना आखून यावर निर्णय घेतला जाईल. परंतु त्यालाही एक पद्धत आहे. त्यानुसार पावले उचलू असे त्यांनी सांगितले


Recent Comments