Banglore

बंगळूर मध्ये कर्नाटक राज्योत्सव दिनाचे आचरण :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन

Share

बेंगळूर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कर्नाटकाचा ६६ वा राज्योत्सव दिन साजरा करण्यात आला. भुवनेश्वरी देवी प्रतिमा पूजनानें मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.

बेंगळूर येथील कंठीरव क्रीडांगणात सार्वजनिक शिक्षण विभाग आणि समग्र शिक्षण कर्नाटक यांच्यावतीने ६६ व्या कर्नाटक राज्योत्सवाचे आचरण करण्यात आले होते. ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना राज्योत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कन्नड राज्योत्सव अत्यंत भव्य प्रमाणात करण्यात आला पाहिजे. कन्नड भाषिकांनी दररोज कन्नड भाषेत बोलले पाहिजे. तसेच कन्नड हि भाषा राज्यापुरती मर्यादित न ठेवता सीमेपार कन्नडची प्रगती झाली पाहिजे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. मुंबई कर्नाटकचे नाव कित्तूर कर्नाटक करण्यात यावे., असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, कित्तूर कर्नाटकाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून राज्यातील कोणताही भाग विकासापासून वंचित ठेवला जाणार नाही. कित्तूर कर्नाटकाच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या असून संपूर्ण कर्नाटकाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कन्नड भाषेचा अधिक विकास, नव्या शैक्षणिक धोरणातील कन्नड भाषेचे महत्व, तांत्रिक शिक्षण यासह कन्नड भाषेसंदर्भात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. कर्नाटकात आपण सर्वजण एकत्र नंदू, कन्नड आणि कर्नाटक यासाठी साऱ्यांनी एकत्रित येऊन काम करू असे आवाहन देखील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.

यावेळी शिक्षण मंत्री बी. सी. नागेश, आमदार रिझवान अर्शद, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: