बेळगावातील ज्येष्ठ पत्रकार राजशेखर पाटील, विलास जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या २७ जणांचा कर्नाटक राज्योत्सवानिमित्त सोमवारी बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी सत्कार करण्यात आला.

बेळगावातील सीपीएड मैदानावर जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी सकाळी ६६वा कर्नाटक राज्योत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते पत्रकारितेत उल्लेखनीय सेवा बजावलेल्या इन न्यूज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजशेखर पाटील, संयुक्त कर्नाटक दैनिकाचे ज्येष्ठ बातमीदार विलास जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
संगीत क्षेत्रात यादवेंद्र पुजारी, गोकाक तालुक्यातील अंकलगीचे रेल्वे गार्ड होळेप्पा नेसरगी, साहित्य क्षेत्रातून डॉ. रामकृष्ण मराठे, आशा कडपट्टी, सौंदत्ती तालुक्यातील मुरगोडचे राजेंद्र मुरगोड, चित्रकला क्षेत्रातून अथणी तालुक्यातील ककमरी गावचे ब्रह्मानंद बसर्गी, पर्यावरण विभागात निपाणीचे फिरोज गुलाब चाहूस, क्रीडा विभागातून मलप्रभा जाधव, समाजसेवा विभागात बैलहोंगल तालुक्यातील संपगावीचे चन्नबसय्या कठारीपुरमठ, डॉ. सुनील नेगिनहाळ, बयलाट विभागात बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावचे शिवलिंगप्पा करवीनकोप्प, कन्नड आंदोलनकर्ते रमेश सोनटक्की, पद्मराज वैजन्नावर, तिप्पेस्वामी, गणेश रोकडे, गुरुगौडा पाटील, बाळू उद्गट्टी, शिवनगौडा पाटील, पत्रकारिता विभागात केशव आदी, श्रीशैल मठद, श्रीकांत कुबकट्टी, कुंतीनाथ कलमनी, महांतेश गद्दीहळ्ळीशेट्टी, सुनीता देसाई, समाजमाध्यम विभागात किरण माळण्णावर यांचा शाल घालून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ तसेच सरकारी अधिकारी, निमंत्रित उपस्थित होते.


Recent Comments