Belagavi

अभिनय, समाजसेवेमुळे अभिनेते पुनीत राजकुमार अजरामर : जिल्हाधिकारी

Share

आपला दमदार अभिनय आणि समाजसेवेमुळे चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार अजरामर झाले आहेत असे उद्गार जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी काढले.

 

बेळगावात शनिवारी स्नेहबळगच्या वतीने पुनीत राजकुमार याना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी पुनीत राजकुमार यांच्या प्रतिमेचे पूजन करून बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ पुढे म्हणाले, कन्नड चित्रपट सृष्टीत आपल्या परीश्रम आणि अंगभूत गुणांमुळे डॉ. राज यांच्या परिवाराने नाव कमावून रसिकांच्या हृदयात घर केले. तोच वारस पुढे चालवत पुनीत राजकुमार यांनी अभिनयाच्या बळावर रसिकांची मने जिंकली. अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी कन्नड चित्रपट सृष्टीत नवा इतिहास घडविला. समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आधार दिला. त्यांच्या निधनामुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु आपल्या अभिनय आणि कार्यामुळे ते अजरामर झाले आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बाईट याप्रसंगी बेळगाव वन्यजीव, पर्यावरण विकास वेदिकेचे अध्यक्ष सुरेश उरबिनहट्टी, सचिव डॉ. डी. एन. मिसाळे, खजिनदार जगदीश मठद, संघटन सचिव प्रा. मारुती कदम, निवृत्त प्राचार्य शिवशंकर अब्बायी, ऍड. रवींद्र कुलकर्णी तसेच पुनीत राजकुमार यांचे चाहते उपस्थित होते.

 

Tags: