प्रख्यात कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार याच्या अकाली मृत्यूच्या धक्क्याने त्यांच्या चाहत्याने आत्महत्या केल्याची घटना अथणी येथे घडली.

होय, कन्नड चित्रपट शौकिनांचे लाडके अभिनेते ‘अप्पू’ ‘पॉवर स्टार’ पुनीत राजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण कर्नाटकावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या घटनेचा जबर धक्का बसला असून त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले आहेत. अथणीतील एका चाहत्याने तर हा धक्का सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अथणी शहरातील २२ वर्षीय युवक राहुल गाडीवड्डर याने हे टोकाचे पाऊल उचलले. राहुल व त्याच्या मित्रांनी शुक्रवारी पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच एकत्र जमून पुनीत यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर घरी जाऊन राहुलने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. अथणी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments