Belagavi

शिवबसव नगरातील युवकाचा अपघातात मृत्यू

Share

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेला युवक दुचाकीवरून पडून डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी अशोक नगर कॅन्सर हॉस्पिटल समोर घडली. निखिल गिलबट चिनिया जॉवेल (वय 30) रा. शिवबसव नगर असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. हा आपल्या मित्राची मोटरसायकल होंडा शाइन घेऊन काही कामासाठी गेला होता. अशोकनगर कॅन्सर हॉस्पिटल नजिक येताच अडचणीच्या जागेतून ट्रकला ओव्हरटेक करतेवेळी तोल गेल्याने पडला गेला.

यावेळी त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक येऊन पाहणी करून घटनेचा पचनामा केला. मात्र या युगाची ओळख पटू शकली नव्हती दुचाकीच्या गाडी नंबर वरून वाहन मालकाला संपर्क साधण्यात आला यानंतर मयत झालेल्या युवकाची ओळख पटली या युवकाचा मृतदेह जिल्हा इस्पितळातील शिवगृहात ठेवण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी अंतिम क्रिया करण्यात येणार आहे. या घटनेचा गुन्हा वाहतूक उत्तर पोलीस स्थानकात नोंद झाला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags: