Hukkeri

हुक्केरी येथे कन्नड गीत गायन अभियान उत्साहात

Share

कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कन्नड गीत गायन अभियान आयोजित करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून हुक्केरी येथे कन्नड गीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते.

कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने एक आठवडाभर राबविण्यात येत असलेल्या कन्नड गीत अभियानांतर्गत आज हुक्केरी येथील एस के हायस्कुल मैदानावर कन्नड गीत गायन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कन्नड विकास प्राधिकरणाच्या आदेशानुसार सदर उपक्रम राबविण्यात आला.

तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागाचे अधिकारी, खाजगी संस्था, शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी, कन्नड अभिमानी यांच्या सहयोगाने राष्ट्रकवी कुवेम्पू यांनी रचलेले कन्नड अभिमान गीत गायिले. तसेच कन्नड भाषेची शपथ एकमुखाने घेण्यात आली.

यावेळी बेळगाव विभागाधिकारी रवींद्र करलिंगन्नावर, तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, इ ओ उमेश सिदनाळ, बीईओ मोहन दंडीन, अनुसूचित समाजाचे अधिकारी व्ही. आर. नागनूर, कृषी अधिकारी महादेव पटगुंडी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: