मिरज येथे वंध्यत्व निवारणासाठी एक उत्तम ठिकाण आहे. नुकतेच सचिन हॉस्पिटल च्या वतीने दाम्पत्य आणि महिलांशी निगडित आजारपणावर आधारित शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्त्रीरोग, वंध्यत्व यावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन सुगणनावर यांनी केले. सचिन हॉस्पिटल येथे स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारणावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उत्तम उपचार केले जातात. वंध्यत्व निवारणासाठी प्रसिद्ध मानल्या जाणाऱ्या सचिन हॉस्पिटलमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवर एकाच छताखाली उपचार करण्याची सुविधा आहे. या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा अनेक नागरिकांना लाभ होत असून आज आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचाही लाभ अनेक नागरिकांना झाला आहे.

सदर शिबिरात स्त्रीरोग, वंध्यत्व, वंध्यत्वाची कारणे, आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती यावर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच टेस्ट ट्यूब बेबी आणि यासंदर्भात असलेले समज, गैरसमज आणि उपयुक्त माहिती या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली. टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात सचिन हॉस्पिटल मध्ये असलेल्या आंतराष्ट्रीय प्रयोगशाळेचीही माहिती देण्यात आली.


Recent Comments