Belagavi

जागतिक मणका दिनानिमित्त बेळगावात फेरी

Share

जागतिक मणका दिनानिमित्त बेळगावात रविवारी सकाळी जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले

 होय, बेळगावात रविवारी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या मस्तिष्क रोग विभागातर्फे केएलई डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळाच्या सहयोगाने जागतिक मणका दिनानिमित्त जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. चन्नम्मा सर्कलपासून केएलई इस्पितळापर्यंत ही फेरी काढण्यात आली.  

बेकगावातील चन्नम्मा चौकात केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी झेंडा दाखवून फेरीला मार्गस्थ केले. पाठीच्या मणक्यावर येणारा ताण आणि त्यामुळे उदभवणाऱ्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी या वोकेथॉनचे आयोजन केले होते. त्यात सहभागी विध्यार्थ्यानी हातात पाठीच्या कण्याविषयी जागृती करणारे फलक घेत जागृती केली. याप्रसंगी काहेरचे कुलसचिव डॉ. व्ही. . कोठीवाले, जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. एन. एस. महंतशेट्टी, उपप्राचार्य डॉ. राजेश पोवार आणि विविध विभागांचे विध्यार्थी उपस्थित होते.

Tags: