Belagavi

कागवाडमध्ये रौप्यमहोत्सवी कित्तूर उत्सवाचे आचरण : तहसीलदारांच्या उपस्थितीत राणी चन्नम्मांना अभिवादन

Share

कागवाड तहसीलदार कार्यालयात तसेच कित्तूर चन्नम्मा चौकात वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन कागवाड चे तहसीलदार राजेश बुरली यांच्याहस्ते करण्यात आले.सर्वप्रथम राणी चन्नम्मा यांच्या प्रतिमेला तहसीलदारांच्या पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपतहसीलदार अण्णासाहेब कोरे सीडीपीओ संजीवकुमार सदलगे यांच्यासह तालुका अधिकारी आणि करवे संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना तहसीलदार राजेश बुरली म्हणाले, विरारणी कित्तूर चन्नम्मा या भारतातील एक शूरांगणा म्हणून प्रसिद्ध आहेत. ब्रिटिशांसोबत झालेल्या स्वातंत्र्य चळवळीत धैर्याने आणि शौर्याने बलिदान देणाऱ्या कित्तूर चन्नम्मा या आपल्या राज्यातील आहेत, कित्तूर चन्नम्मा यांचे आदर्श आजच्या महिलांनी घेणे गरजेचे असून राणी चन्नम्मा यांच्या कार्याचा आपल्याला अभिमान आहे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना सीडीपीओ संजीवकुमार सदलगे म्हणाले, आपल्या सैन्यासहित ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या या शूर विरांगनेने सैन्याच्या मुलांना आपल्याकडे आसरा दिला. अन्न पाणी, राहण्याची, शिक्षणाची सोय केली. त्यांच्या शौर्यासहित आपुलकी आणि प्रेमाचे गुणही विशेष होते, या सर्वांचे आपल्याला सतत स्मरण असायला हवे, असे मत संजीवकुमार यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात प्रा. अशोक पाटील, करवे नेते शिवानंद नविनाळे, पीकेपीएस अध्यक्ष ज्योतीकुमार पाटील यांचीही भाषणे झाली.या कार्यक्रमाला उपतहसिदार अण्णासाहेब कोरे, एम. आर. पाटील, ईसार बसवराज रजकनवर, शिवानंद नविनाळे, ज्योतीकुमार पाटील, बसवराज मगदूम, सिद्दू पाडियर, काका पाटील, गौरीश पाटील, गणेश कोळेकर, सचिन कुरुंदवाडे, सचिन पाटील, प्रवीण पाटील, रामू वड्डर, अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांसह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: