Belagavi

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली रणकुंडये वादाची माहिती

Share

बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी बेळगाव तालुक्यातील रणकुंडये गावाला भेट देऊन हिंदू-मुस्लिम समाजाच्या नेत्यांकडून मंदिर बांधण्यावरून झालेल्या वादाची माहिती घेतली.
रणकुंडये गावात दोनच दिवसांपूर्वी मंदिर बांधकामावरून झालेल्या वादाचे पर्यावसान मारामारीत होऊन चौघेजण जखमी झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी शान्ततासभ घेऊन या वादाचा राजकीय लाभ कोणाला घेऊ द्यायचे नाही असा निर्णय घेतला होता.

त्याचप्रमाणे हिंदू-मुस्लिमांनी पूर्वीप्रमाणेच गावात एकोप्याने रहायचे असेही ठरविण्यात आले होते. दरम्यान, आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी गावा भेट देऊन मंदिर निर्माणानंतर महाप्रसादासाठी ३० हजार तर मंदिराभोवती संरक्षक भिंतीसाठी व इतर कामासाठी २० असे एकूण ५० हजार रु देणगी देवस्थान कमिटीकडे दिली. बाहेरून आलेल्या काही व्यक्तींनी गावात येऊन निर्माणाधीन देवस्थान पाडले. त्यांना विचारायला गेलेल्या ग्रामस्थांना बाहेरून आलेल्यांनी देवस्थानात पूजेमुळे आम्हाला त्रास होतो असे सांगून ते पाडले. त्यामुळे २ गटांत हाणामारी झाली असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. फ्लो

Tags: