कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने आज भव्य प्रमाणात काकती येथे कित्तूर चन्नम्मा यांच्या गावी कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव जिल्हा प्रशासन, काकती ग्राम पंचायत तसेच विरराणी चन्नम्मा उत्सव समिती, काकती यांच्या संयुक्त विद्यमाने आज सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात विरराणी कित्तूर चन्नम्मा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी वीररज्योतीची भव्य प्रमाणात मिरवणूक काढली. या मिरावणुकीत महिला आणि आबालवृद्धांसाहित सर्वजण उत्साही वातावरणात सामील झाले होते. झंझपाथक, विविध वादयमेळ यांच्या माध्यमातून या मिरवणुकीला भव्य असे स्वरूप प्राप्त झाले होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, चिक्कोडी खासदार अण्णासाहेब जोल्ले, शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., यांच्याहस्ते चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, कित्तूर आणि काकती येथे अनेक विकासकामे करायची आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. यासह हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट्य आहे. हा उत्सव केवळ आचरणात आणायचा नसून कित्तूर चन्नम्मा यांचे आदर्श देखील आचाराणात आणणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
यानंतर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कित्तूर संस्थानासाहित अनेक जागा खरेदी करून त्याचा विकास करण्याचे कार्य जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यासंदर्भात जागा मालकाशी चर्चा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे सध्या संपर्क होऊ शकला नसून पुढील वर्षापर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे सदर जागा खरेदी करून चनम्मा यांच्या स्मृतींसाठी वस्तुसंग्रहालय उभे करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी माजी मंत्री शशिकांत नाईक, जिल्हा पंचायत माजी सदस्य सिद्धगौडा सूनगार, तालुका पंचायत माजी सदस्य यल्लप्पा कोळेकर, चन्नम्मा उत्सव समिती काकती चे अध्यक्ष एस डी पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments