बेळगावातील केएलएस संस्थेच्या आयएमईआरतर्फे पीजीसीईटी–केमॅटसाठी क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.

एमबीए प्रवेशासाठी पीजीसीईटी-केमॅट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी २५ ते २८ ऑक्टोबरपर्यंत आयएमईआरमध्ये क्रॅश कोर्स घेण्यात येणार आहे. लॉजिकल रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍनालिसिस, इंग्लिश, जनरल नॉलेज यावर या कोर्समध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. सहभागी विध्यार्थ्यांना आयएमईआरचे ग्रंथालय व अन्य सुविधा वापरता येणार आहेत. इच्छुक विध्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी डॉ. अरिफ शेख, प्रा. अमित कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आपले आहे.


Recent Comments