Belagavi

नव्याने धर्मांतरबंदी कायदा आणण्याची गरज नाही : बिशप डेरेक फर्नांडिस

Share

 धर्मांतर बंदीसाठी प्रचलित अनेक कायदे सक्षम आहेत. त्यामुळे सरकारने नव्याने धर्मांतरबंदी कायदा आणण्याची गरज नसल्याचे बेळगाव ख्रिश्चन धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी सांगितले.

बेळगावात शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना बिशप डेरेक फर्नांडिस म्हणाले, धर्मांतर रोखण्यासाठी भारतीय घटनेत आणि भारतीय दंड संहितेत अनेक कडक कायदे सध्या आहेत. त्यामुळे नव्याने धर्मांतरबंदी कायदा आणण्याची गरज नाही. नवा कायदा आणला तर त्याचा दुरुपयोगच अधिक होण्याची शक्यता आहे. आम्ही ख्रिश्चनसुद्धा या देशाचे उत्तम नागरिक आहोत. आम्हाला चांगल्या पद्धतीने जगण्याची संधी सरकारने देऊन आमचे रक्षण केले पाहिजे.

धर्मांतर विरोधी कायद्याच्या संभाव्य दुरुपयोगाविषयी बिशप फर्नांडिस म्हणाले, नव्या कायद्यांमुळे ख्रिश्चन समाजाला त्रास होण्याची शक्यता आहे. आम्ही ४-६ लोक एकत्र येऊन जप-तप करू लागलो तर, आम्ही धर्मांतर करत आहोत असा समज करून आम्हाला, ख्रिश्चन समाजाला त्रास दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने याबाबत काळजीपूर्वक पावले उचलण्याची गरज आहे.

धर्मांतराच्या वाढत्या तक्रारींमुळे सरकार राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा विचार करत आहे. त्याला काही समाज घटकांकडून विरोधही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकार कोणता निर्णय घेणार हे जाणण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे

 

 

 

Tags: