बेळगावात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये आयएएस टॉपर्सचा सत्कार आणि त्यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावर्षीच्या आयएएस परीक्षेतील टॉपर्सचा सत्कार आणि त्यांच्याशी संवाद कार्यक्रम शनिवारी बी. के. कॉलेजमध्ये पार पडला. फ्लो
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हुबळीतील वाणिज्य कर विभागाचे सहायक आयुक्त शाकीर अहमद तोंडीखान म्हणाले, विध्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर अकरावी-बारावीत किंवा पदवीपासूनच त्याचा अभ्यास सुरु केला पाहिजे. या टप्प्यातच नियमित अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्याने लक्षित ध्येय गाठता येते. या परीक्षा सामान्य परीक्षेप्रमाणे असत नाहीत. बहुपर्यायी स्वरूपाच्या असतात. त्यामुळे विध्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागतो. म्हणून विध्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर एका विशिष्ट टप्प्यातच त्यांचा अभ्यास सुरु केला पाहिजे. तरच अपेक्षित यश गाठता येते असे त्यांनी सांगितले.
यावेळी रोजगार आणि उद्योग प्रशिक्षण खात्याच्या संयुक्त संचालिका साधना पोटे, वेंकटराजू, प्रा. विक्रम पाटील, प्रा. शुभम चव्हाण, डॉ. एस. एन. पाटील, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, ज्योती करिअर अकादमीचे संचालक अमित व्ही. सुब्रमण्यम आदी उपस्थित होते.


Recent Comments