Belagavi

राणी चन्नम्मा विरज्योतीचे बेळगावमध्ये आगमन , जिल्हा प्रशासनाच्यावतीने ज्योतीचे स्वागत

Share

२३ आणि २४ ऑक्टोबर असे दोन दिवस साजऱ्या होणाऱ्या कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खानापूरमधून आलेल्या विरज्योतीचे बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले.

येत्या २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खानापूरहून आलेल्या विरज्योतीचे आगमन बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात मोठ्या उत्साहात, वाद्यवृंदाच्या गजरात झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह इतर मान्यवरांनी विरज्योतीचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यानंतर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार मंगला अंगडी म्हणाल्या, एका विरांगणेच्या विरज्योतीचे खानापूरहून आगमन झाले आहे. या विरज्योतीचे आगमन करताना मला अत्यानंद होत आहे. दरवर्षी कित्तूर महोत्सव अशाचपद्धतीने साजरा करण्यात यावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यानंतर जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ बोलताना म्हणाले, राणी चन्नम्मा यांचा २५ वा उत्सव मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत. मुख्यमंत्र्यांसहित अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून या विरज्योतीच्या मिरवणुकीला बैलहोंगलपासून सुरुवात झाली आहे. अनेक तालुक्यांमधून हि विरज्योती संचार करून २३ ऑक्टोबर रोजी कित्तूर येथे पोहोचणार आहे. कोविड मार्गसूचीनुसार कित्तूर उत्सव आचरणात आणण्यात येणार असून या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन, उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी एसी रवी करलिंगनवर, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री, पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, कन्नड नेते महादेव तळवार, कस्तुरी भावी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: