Belagavi

अरबाज मुल्ला खून प्रकरणातील आरोपी सुटू नयेत : गौरम्मा

Share

राज्यातील ऑनर किलिंग प्रकरणातील आरोपी सुटू नयेत. अरबाज मुल्ला खून प्रकरणातील आरोपीही सुटू नयेत याची दक्षता पोलिसांनी घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय चलवादी महासभेच्या महिला अध्यक्ष गौरम्मा यांनी केली

बेळगावात सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना अ. भा. चलवादी महासभेच्या महिला अध्यक्ष गौरम्मा म्हणाल्या, गटनात्मक लोकशाही असलेल्या देशात ऑनर किलिंग सारखी प्रकरणे घडत आहेत हे दुर्दैवी आहे. कोणाशीही प्रेम करण्याचा, लग्न करण्याचा हक्क घटनेने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अशा प्रकरणांचे खंडन केले आहे. मुलीच्या पालकांनी अरबाज मुल्ला याचा श्रीराम सेना हिंदुस्थानच्या तालुकाध्यक्षाला सुपारी देऊन खून करविला हे खंडनीय आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी समाजसेवक शिवाजी कागणीकर, शारदा गोपाल, शिल्पा कोलकार, राजेश्वरी जोळी, वीणा चन्नी आदी उपस्थित होते.

 

Tags: