Belagavi

कल्याणराव मुचळंबी यांना बेळगावात आदरांजली

Share

लढाऊ शेतकरी नेते, पत्रकार कल्याणराव मुचळंबी यांना बेळगावात विविध शेतकरी अन्य संघटनांतर्फे रविवारी आदरांजली वाहण्यात आली.

बेळगावातील कन्नड साहित्य भवनात लढाऊ शेतकरी नेते, पत्रकार कल्याणराव मुचळंबी यांच्या निधनानिमित्त रविवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्यासह विविध मान्यवरांनी मुचळंबी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.  शोकसभेत बोलताना माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी कल्याणराव मुचळंबी यांच्या लढाऊ बाण्याचा गौरव करून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. राज्य आणि देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोदी सरकार अनेक योजना राबवून चांगले कार्य करत आहे. काही त्रुटी दूर करून योजना राबवून कार्य केल्यास शेतकऱ्यांची प्रगती अशक्य नाही असे त्यांनी सांगितले ,

यावेळी शेतकरी नेते मल्लिकार्जुन वाली, अशोक पुजारी, ऍड. एन. आर. लातूर, सिदगौडा मोदगी, चुन्नाप्पा पुजारी, सरोजिनी, शिवनगौडा पाटील, अप्पासाहेब देसाई आदी उपस्थित होते.

 

 

Tags: