हुक्केरी हिरेमठाच्या वतीने दरवर्षी दसरा उत्तर दिला जाणारा एस. जे. नागलोतीमठ साहित्य रत्न पुरस्कार यंदा अथणीच्या मोटगीमठाचे प्रभू चन्नबसव स्वामीजी लिखित ‘महात्म्यांचे चरितामृत‘ या पुस्तकाला देण्यात येणार आहे अशी माहिती हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.

हुक्केरी येथे श्रीमठात पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी म्हणाले, दरवर्षी दिल्या जाणाऱ्या एस. जे. नागलोतीमठ साहित्य रत्न पुरस्कारासाठी यंदा ‘महात्म्यांचे चरितामृत’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.
शनिवारी सायंकाळी होणाऱ्या समारंभात वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभात मोटगीमठाच्या प्रभू चन्नबसव स्वामीजीना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या प्रसंगी श्रीमठाचे शिष्य सुरेश जिनराळे, चन्नाप्पा गजबर, सी. एम. दरबारे आदी उपस्थित होते.


Recent Comments