Khanapur

महाविद्यालय पुन्हा खानापूरला आणण्यात आ. डॉ. अंजली निंबाळकर यशस्वी

Share

 गेल्या वर्षांपूर्वी खानापूर तालुक्याला मंजूर झालेले पदवी महाविद्यालय गदगला स्थलांतरित करण्यात आले होते. ते पुनः खानापूरला आणण्यात . डॉ. अंजली निंबाळकर यशस्वी झाल्या आहेत.

होय, यापूर्वी खानापूर तालुक्याला मंजूर झालेले सरकारी पदवी महाविद्यालय गदगला स्थलांतरित करण्यात आले होते. माजी मंत्री एच. के. पाटील यांच्या मदतीने ते पुन्हा खानापूरलाच आणण्यात आ. अंजली निंबाळकर याना यश आले आहे. या. निंबाळकर यांनी स्वतःच हि माहिती दिली. बिडी गावच्या विस्तारित भागात या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी २ कोटी रुपयांचे अनुदानही सरकारने मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, बिडी भागात सरकारी पदवी महाविद्यालय सुरु करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यातही मंजूर झालेले पदवी महाविद्यालय गदगला स्थलांतरित करण्यात आले होते. ते पुन्हा खानापूर तालुक्यात आणत इमारत बांधकामासाठी २ कोटी निधी आणल्याबद्दल खानापूर तालुकावासीयांनी आ. निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.

 

Tags: