Hukkeri

हुक्केरीत ३० लाख निधीतून रस्ताकामांना  प्रारंभ

Share

हुक्केरी शहरातील आंबेडकर नगरात ३० लाख रुपये निधीतून विविध रस्त्यांच्या कामांना जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांच्याहस्ते भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला.

झोपडपट्टी विकास महामंडळाकडून मंजूर झालेल्या ३० लाख रुपये निधीतून हुक्केरी शहरातील आंबेडकर नगरात विविध रस्त्यांच्या कामांना गुरुवारी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांच्याहस्ते भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जि. पं. सदस्य पवन कत्ती म्हणाले, हुक्केरीचे आ. उमेश कत्ती यांच्या विशेष प्रयत्नांतून हुक्केरीतील झोपडपट्टी प्रदेशात सिमेंट काँक्रेटचे दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी स्लम बोर्डाने ३० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटदाराने दर्जेदार काम करावे. त्याला स्थानिक रहिवाशांनी सहकार्य करावे, कामाच्या दर्जावर लक्ष द्यावे. आगामी काळात हुक्केरी शहरात झोपड्पट्टीवासीयांसाठी १३०० घरे बांधण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे.

यावेळी हुक्केरी नगरपंचायतीचे अध्यक्ष ए. के. पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, सदस्य संगीता हुक्केरी, राजू मुन्नोळी, सदा कऱेप्पगोळ, मधु कर्णींग, राजू कुरंदवाडे, उदय हुक्केरी, मुख्याधिकारी मोहन जाधव, स्लम बोर्डाचे अधिकारी मारुती लमाणी, शुभलिंगाप्पा, मणिराज एम. जी., कंत्राटदार एम. संतोष आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: