Athani

तरुणींशी असभ्य वर्तन करणाऱ्या युवकाचे केले मुंडन

Share

तरुणी आणि महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या एका युवकाला गावकऱ्यांनी चांगलीच अद्दल घडविल्याची घटना अथणी तालुक्यातील गावात घडली आहे.

तरुणी आणि महिलांशी असभय वर्तन करून वॉट्सअप वरून अश्लील मॅसेज पाठविणाऱ्या युवकाला अथणी तालुक्यातील महिष्वडी ग्रामस्थांनी चांगलीच शिक्षा दिली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल साईटवर चांगलंच व्हायरल झाला असून गावकऱ्यांनी या तरुणाने केलेल्या उपद्व्यापी कारभाराची शिक्षा दिली आहे. या तरुणाचे मुंडन करत त्याला गावाबाहेरचा रस्तादेखील दाखवला आहे.

सुधाकर डुम्मनावर असे या तरुणाचे नाव असून गावातील अनेक तरुणी आणि महिलांची त्याने छेड काढल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक तरुणींचा पाठलाग करून त्यांचे मोबाईल नंबर मिळवून वॉट्सअप च्या माध्यमातून त्यांना अश्लील व्हिडीओ पाठवून असभ्य वर्तन केल्याचा आरोप गावकऱ्यांनी लावला आहे. त्याच्या या कृतीचा चांगलाच समाचार गावकऱ्यांनी घेतला असून या तरुणाला पकडून त्याचे मुंडन करत त्याच्या मिशादेखील कापल्या आहेत. याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल साईटवर व्हायरल होत आहे.

Tags: