Bailahongala

इंस्टाग्राम अकाउंटवर कन्नड समाजकंटकाने केला छत्रपती शिवरायांचा अपमान :  इतिहासाची पायमल्ली

Share

बेलवडी मल्लमांचा  खरा इतिहास बदलून , छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे चित्र रेखाटून , ते इंस्टाग्रामवर वायरल करणाऱ्यांविरुद्ध , बेळगावच्या खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे .: ” नवीन  नान कन्नडीग ” या इंस्टाग्राम अकाउंटवर , बेलवडी मल्लामा यांच्या जयंती उत्सवावेळी , हा फोटो वायरल करण्यात आला आहे .

बेळगाव शहरातील बापट गल्लीतील रहिवासी रोहित भाऊसाहेब मुरकुटे यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात  ” नवीन  नान कन्नडीग ” या  इंस्टाग्राम  आयडी असलेल्या व्यक्तीच्या  विरोधात  फिर्याद दाखल केली आहे .

खऱ्या इतिहासाची माहिती नसताना , या व्यक्तीने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे . त्याचप्रमाणे , बेळगावमधील कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये  प्रतिकूल  वातावरण निर्माण करणाऱ्या या समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी  फिर्यादीने केली आहे .

 

 

 

Tags: