Khanapur

पत्रकार यल्लाप्पा कानार याना खानापुरात आदरांजली

Share

लोंढा येथील पत्रकार यल्लाप्पा कानार यांच्या निधनाबद्दल खानापूर तालुका पत्रकार संघ आणि तालुका फोटोग्राफर संघटना व संघ-संस्थांच्या वतीने मंगळवारी त्यांना आदरांजली वाहण्यात आली.: विजय कर्नाटक या कन्नड दैनिकाचे पत्रकार व छायाचित्रकार यल्लाप्पा कानार यांचे ८ दिवसांपूर्वी आजाराने निधन झाले. या लढवय्या पत्रकाराच्या निधनाने खानापूर तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी जाणार याना आदरांजली वाहताना एका पत्रकाराने सांगितले की, लोंढासारख्या दुर्गम, डोंगराळ भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कानार यांनी सतत लेखन केले. पांढरी नदीला आलेल्या पुराचे वार्तांकनासाठी गेले असता ते नदीत घसरून पडले, त्यांचा कॅमेराही पाण्यात पडून खराब झाला. त्यानंतर ते आजारी पडले आणि दुर्दैवाने उपचारांचा उपयोग न होता ८ दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो.

यावेळी अन्य पत्रकारांची शोकभावना व्यक्त केल्या. शोकसभेला ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे, खानापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे, नारायण कपोलकर, सुनील चिगूळकर तसेच पत्रकार, छायाचित्रकार आदी उपस्थित होते.

Tags: