लिंगराज महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे एनसीसी दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . रक्तदानातून रुग्णांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे प्रत्येकाने स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन कर्नल सुनील दागर यांनी केले.

२६ कर्नाटक एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील दागर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एक ते तीन वेळा रक्तदान करावे. रक्तदान हे सामाजिक सेवेतील महत्त्वाचे योगदान असून ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही लाभदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

लिंगराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एच. एस. माळीमन यांनी एनसीसी छात्रांमध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी शिबिर आयोजित केल्याचे सांगितले. एनसीसीच्या माध्यमातून युवकांमध्ये आत्मविश्वास, नैतिक बळ आणि देशप्रेमाची भावना विकसित केली जाते. रक्तदान शिबिरातून एनसीसी दिन अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिराचे आयोजन एनसीसी, रेडक्रॉस, राष्ट्रीय सेवा योजना आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व संशोधन केंद्राच्या रक्तपेढीच्या सहकार्याने करण्यात आले.
यावेळी डॉ. विठ्ठल माने, डॉ. गंगाधर भगवंतनवर, मेजर डॉ. महेश गुरनगौडर, कॅप्टन डॉ. शिवानंद बुलबुले, एच. एन. बन्नूर, प्रशांत कोन्नूर आणि शशिकांत तारदाळे उपस्थित होते.


Recent Comments