Kagawad

कागवाडच्या विद्यावर्धक शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून गुरूंचा सन्मान

Share

विद्यावर्धक शिक्षण समितीच्या १९७९-८० च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल चार दशकांनंतर एकत्र येत आपल्या शिक्षकांचा गुरुवंदना कार्यक्रमातून सन्मान केला.

कागवाड येथील बाबनगौडा पाटील कन्नड माध्यम शाळेत रविवारी हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीकेपीएसचे अध्यक्ष व अॅड. काका पाटील होते.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पुष्पवृष्टीने स्वागत करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

शिक्षक एस. एम. मठपती, आर. ए. पाटील आणि एम. बी. उदगावे यांनी विद्यार्थ्यांच्या या कृतज्ञतापूर्वक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

सुमारे ८० माजी विद्यार्थ्यांपैकी ५० हून अधिक जणांनी सहभाग घेतला. त्यांना शिकविणाऱ्या ३२ शिक्षकांपैकी ८० वर्षांवरील तीन ज्येष्ठ शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी निवृत्त डीवायएसपी बाबासाहेब हुल्लनवर, केएलई संस्थेचे निवृत्त प्राचार्य आर. एन. पाटील, मिरज हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य डी. जी. लांडगे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: