विजापूर शहरात कित्तूर राणी चन्नम्मा यांचा जयंती आणि विजयमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीत महिलांची दुचाकी रॅली विशेष आकर्षण ठरली.

कर्नाटक राज्य कित्तूर राणी चन्नम्मा उत्सव समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध समाजांचे नेते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चन्नम्मा चौकातून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. महिलांची दुचाकी रॅली आणि दहा खुल्या जीप मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरल्या. महिलांनी दुचाकी रॅलीतून चन्नम्मा यांच्या धैर्य, शौर्य आणि संघर्षाचा संदेश दिला.

शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवरून मार्गक्रमण करत मिरवणूक मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचली. विविध समाजघटकांनी एकत्रित सहभाग घेत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. यावेळी कित्तूर राणी चन्नम्मा यांचे देशप्रेम, ब्रिटिशांविरुद्धचा लढा आणि त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


Recent Comments