‘बसव मंडप’ पुस्तकाच्या वादावरून बेळगावात बसवप्रेमी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लेखक रवी हंज आणि प्रकाशक विश्वेश्वर भट यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात बसव जाणिवा व संशोधन केंद्र (पुणे- बेळगाव विभाग) आणि लिंगायत संघटना, बेळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना निवेदन पाठविण्यात आले. तसेच लेखक रवी हंज यांचा पासपोर्ट जप्त करून अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या निदर्शनास ही बाब आणावी आणि त्यांचे अमेरिकेचे नागरिकत्व रद्द करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली.

यावेळी डॉ. शशिकांत पट्टण, ईरण्णा दयण्णवर, ॲड. सुनील साणिकोप्प, शशिभूषण पाटील, सुधा पाटील, आशालता सोगलद, रत्नक्का साणिकोप्प, संगमेश अरळी, सुरेश नरगुंद, रमेश कळसन्नवर, सदाशिव देवरमनी, शंकर गुडस, नागनगौडा, श्रीरंग जोशी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.


Recent Comments