बेळगावात विजय कर्नाटक रक्षण वेदिकेच्या जिल्हा शाखेची संघटनात्मक बैठक झाली. भूमी, जल आणि भाषेच्या रक्षणासह शोषित व मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन संस्थापक प्रदेशाध्यक्ष महेश कुमार यांनी केले.

शहरात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महेश कुमार होते. जिल्ह्यात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून सातत्याने कार्यरत राहावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संघटनेच्या नवीन शाखा स्थापन करून तळागाळापर्यंत संघटनेचा विस्तार करण्याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष स्मिता पुजारी, उपाध्यक्ष गीता जिनबसप्पनवर, जिल्हा खजिनदार नितीन चौगुले यांच्यासह जिल्हा पदाधिकारी आणि विविध तालुका शाखांचे अध्यक्ष उपस्थित होते.


Recent Comments